मनमाड | Manmad

करोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड शहरात लागू करण्यात आलेल्या तीन दिवशीय जनता कर्फ्युला आज (सोमवार)तिसऱ्या दिवशीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

शहरातील सर्व दुकानी व व्यवहार कडकडीत बंद होती. नगराध्यक्ष व पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांनी शनिवार ते सोमवार या तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू घोषणा होती..

दरम्यान आर्थिक घडी बिघडू नये म्हणून मुख्यमंत्री पासून विरोधी पक्ष नेत्या पर्यंत सर्वांनी लॉक डाऊन हा पर्याय नाही असे म्हटले असतांना दुसरीकडे मात्र गोरगरीब,हातावरचे असलेल्यांचा कोताही ही विचार न करता आमच्यावर तीन दिवसाचे लॉक डाऊन लादण्यात आल्याचे मत छोटे दुकानदार,व्यावसायिक आणि हातावर कामधंदा असलेल्यांनी व्यक्त केले.

तीन दिवसाचा लॉक डाऊन लागू करून काय साध्य होणार आहे? तीन दिवसा नंतर कोरोना पळून जाणार आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.कोरोनावर मात करण्यासाठी लॉक डाऊन करण्या ऐवैजी पालिका प्रशासाने इतर नियमांची कडक अंमलबजावणीवर भर द्यावा मात्र तसे न करता केवळ जनतेची अडचण व गैरसोय होणारे मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात आहे असे ही अनेक नागरिकांनी सांगितले

सध्या नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मनमाड शहर परिसरात देखील रोज नवे रुग्ण आढळून येत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याला आळा घालण्यासाठी नगराध्यक्षा पद्मावती धात्रक,मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी शनिवार,रविवार आणि सोमवार असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती.

आज तिसऱ्या दिवशीही त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकानी कडकडीत बंद होते.दुध डेयरीला देखील सकाळी 7 ते 9आणि सायंकाळी देखील 7 ते 9 असे दोन-दोन तासांची वेळ देण्यात आली होती.जनता कर्फ्युचा सर्वात जास्त फटका हा रिक्षा चालक,भाजीपाला विक्रेते,चहा,पान दुकान,इस्त्री करणारे धोबी,छोट्या-मोठया दुकानात काम करणारे नोकर, मजूर यांना बसला त्यांच्यावर एका प्रकारे उपासमारीची वेळ आली.

करोनामुळे गेल्या वर्ष भरापासून आम्ही कधी सुरु-कधी बंदचा सामना करीत असून अगोदरच पूर्वी सारखा काम धंदा मिळत नाही जे जवळ होते ते सर्व संपले आता तर रोज कमविले तरच पोटाची खळगी भरते अशा वेळी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता सलग तीन दिवस लॉक डाऊन लागू करून एका प्रकारे आमच्यावर उपसामारची वेळ आणली आहे असे मत अनेकांनी व्यक्त करून केले.

तीन दिवस लॉक डाऊन लागू करून खरच कोरोना आटोक्यात येणार आहे का ? कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यासाठी कोविड सेंटर सुरू करणे गरजेचे असून ज्या भागात रुग्णाची संख्या जास्त आहे तो भाग प्रतिबंधित करावे मात्र हे न करता लॉक डाऊन लादून पालिका प्रशासनाने काय साध्य केले असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला.