
नाशिक | Nashik
नाशिक रॅन्डोनियर आयोजित १५०० किमीच्या ‘एसआर’ स्पर्धेत ('SR' competition) रामदास सोनवणे, अनिल कुमार सुपे व पुरुषोत्तम मोरे यांनी दिलेल्या वेळेत स्पर्धा पूर्ण केल्याने त्यांनी रॅन्डोनियरचा (Randonnier) किताब पटकवला आहे.
या स्पर्धेत वेगवेगळ्या किलोमीटरचे लक्ष्य दिले जाते आणि ठराविक वेळ मर्यादा ठेवून ते अंतर पार पाडावे लागते. यावेळी नाशिक रॅन्डोनियर आयोजित करण्यात आलेल्या ‘एसआर’ स्पर्धेसाठी पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये ६००, २००, ४००,३०० असा एकूण १५०० किमीचा सायकल प्रवास होता. यावेळेस नाशिक रॅन्डोनियरच्या स्पर्धेत १० सायकलिस्टने सहभाग घेतला होता त्यापैकी वरील तिघांनी हा प्रवास (Travel) पूर्ण केला आहे.
दरम्यान, १५०० किमीच्या सायकल प्रवासाचे आव्हान आतापर्यंत रामदास सोनवणे (Ramdas Sonwane) यांनी दोनदा तर अनिल कुमार सुपे व पुरुषोत्तम मोरे (Anil Kumar Supe and Purushottam More) यांनी एकदा पूर्ण केले आहे.