विहिरीत आढळले तीन मृतदेह

विहिरीत आढळले तीन मृतदेह

देवगाव । वार्ताहर | Devgaon

देवगाव (devgaon) शिवारातील पोटे वस्तीनजीक सकाळी विहिरीवर सौ.पायल रमेश पोटे (वय 19) या महिलेचा मृतदेह (Corpses) तरंगताना आढळून आला आहे. तर त्याच विहिरीत सदर महिलेच्या दिराचा मृतदेह देखील आढळला आहे. तर अन्य एका घटनेत विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत देवगावचे पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना (Lasalgaon Police) कळविले असता स.पो.नि. राहूल वाघ यांनी स.पो.उ.नि. लहानु धोक्रट, पो.नाईक संदीप शिंदे, पो.नाईक औदूंबर मुरडनर यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेचे वैजापूर येथील नातेवाईक येईपर्यंत मृतदेह काढण्यास उपस्थितांनी विरोध केला. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह काढण्यात आला. नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश व संताप बघता अधिक कुमक मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

स.पो.नि. राहूल वाघ यांनी कायदेशीर कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) निफाड ग्रामीण रुग्णालयात (Niphad Rural Hospital) पाठविण्यात आला. पाण्यावर पुरुषाच्या चपला तरंगत असल्याने विहिरीत अजून कुणी आहे का हे शोधण्यासाठी पाण्याचा उपसा करण्यात आला असता दुपारी संदिप एकनाथ पोटे (वय 27) यांचा गाळात फसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

दरम्यान दुसर्‍या घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात काल मंगळवार दि.26 रोजी दुपारी एक विहिरीनजीक मोटारसायकल, मोबाईल, चपला आढळून आल्याने विहिरीच्या पाण्याचा उपसा केला असता प्रणित दत्तात्रय बोचरे (वय 22) याचा मृतदेह आढळून आला.

या दोन वेगवेगळ्या घटनांनी देवगावात खळबळ उडाली असून नागरिक सुन्न झाले होते. लासलगाव पोलीस स्टेशनला (Lasalgaon Police Station) याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद (Accidental death record) करण्यात आली असून लासलगावचे स.पो.नि. राहूल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस नाईक औदूंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com