कोपरगाव
कोपरगाव

नाशिकरोडला गावठी पिस्तूलासह तिघांना अटक

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

देशी बनावटीचे गावठी पिस्तूल बाळगणार्‍या तिघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन जिवंत काडतुसे आढळून आले असून पोलिसांनी काही जणांना दुचाकी गाडीसह ताब्यात घेतले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वपोनि सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल कुवर, प्रकाश भालेराव, जुंद्रे आदि परिसरातील सुभाषरोड भागात गस्त घालत होते. याच दरम्यान या पथकाला खबर मिळाली की, हॉटेल दिपकसमोर तिघे संशयित उभे असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस असल्याचे समजले.

त्यानंतर या सर्वांनी सापळा रचून या तिघांची चौकशी केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी एकाजवळ कमरेला गावठी पिस्तुल व खिशात तीन जिवंत काडतुसे असल्याचे सापडले. त्यानंतर त्यांची विचारपूस केली असता त्यांची नावे साहिल सुरेश मस्के (२०) रा. जेलरोड, नाशिकरोड, योगेश श्रावण बोडके, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड, संदीप अलोकनाथ उर्फ बाबू मुक्तार मनियार, रा. देवळालीगाव, नाशिकरोड असे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून पोलिसांनी अ‍ॅक्टिवा गाडी जप्त केली. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वपोनि सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विशाल कुवर, प्रकाश भालेराव हे करीत आहेत.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com