गांजाची शेती करणाऱ्या तिघांना अटक; येवला तालुक्यात कारवाई

गांजाची शेती करणाऱ्या तिघांना अटक; येवला तालुक्यात कारवाई

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ (Adgaon Repal) शिवारात गांज्याची शेती करणाऱ्या तिघांना येवला तालुका पोलिसांनी (Yeola Police) अटक केली आहे...

येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव रेपाळ शिवारात कांद्याच्या शेतामध्ये गांजाची काही झाडे असल्याची गुप्त माहिती येवला तालुका पोलीस निरीक्षक भवारी यांना मिळाली होती.

यानंतर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तातडीने पथक नेमून गांजाची शेती असलेल्या ठिकाणी दुपारी दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी कांद्याच्या शेतात ८ गांजाची झाडे उभी असलेली दिसून आली. या झाडांचे वजन केले असता तीन किलो १०० ग्रॅम व अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी संतोष महाले, सचिन महाले, संदीप महाले या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तालुका पोलीस निरीक्षक भवारी, सहा. पोलीस निरीक्षक भिसे, पो.हवा. शेख, पो.शि. चव्हाण, निकम, पिसाळ, पारधी यांनी सहभाग घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com