कृषी विभागातील गैरव्यवहार प्रकरणी तिघांना अटक

 कृषी विभागातील गैरव्यवहार प्रकरणी तिघांना अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कृषी विभागातील Department of Agriculture पाणलोट व मजगीच्या शेतकरी योजनांच्या कामांमध्ये पेठ तालुक्यात Peth Taluka झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी Fraud ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करत त्यांना न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामध्ये सन 2011 ते 2017 दरम्यान झालेल्या घोटाळ्यात पेठ तालुक्यातील 147 शेतकऱ्यांनी काम करून देखील कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना मोबदला दिला नव्हता.

कृषी विभाग कडून पाणलोट व मजगीचे कामे करण्यात येतात त्यात ट्रॅक्टरद्वारे काम करताना ट्रॅक्टर चालकांकडून निवदा मागवून त्यानुसार काम देण्याची पद्धत आहे. मात्र कृषी विभागाने ही कामे करताना रक्कम न देता व कामे न करताच बिले मंजूर करून व निविदा काढून गैरव्यवहार केल्याची तक्रार ठेकेदार योगेश सापटे यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी न्यायालयाने संशयितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत पोलिसांना गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते, त्यानुसार कृषी विभागातील 16 कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com