धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra highway) पाथर्डी (Pathardi) फाटा येथे लोखंडी धारदार शस्त्र (weapon) बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar police) अटक (arrested) केली आहे...

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कॅफे हॉटेल जवळील धनलक्ष्मी शाळेसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तरुणांकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती इंदिरानगर (Indiranagar) पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलीस हवालदार लक्ष्मण बोराडे त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनचे (Indiranagar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे (Sanjay Bamble) सपोनि निखिल बोंडे (Nikhil Bonde) हेदेखील तेथे पोहचले. तरुणांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सागर बबन जाधव याच्या पँटमध्ये कमरेजवळ लोखंडी तलवार (Iron sword) खोचलेली आढळली. यावेळी त्याच्यासोबत इतर दोन तरुण होते.

याप्रकरणी सागर बबन जाधव (२३, रा. माउंट पॅराडाईज हॉटेलजवळ, घोटी) विकास तानाजी घोटे (२२, रायगडनगर, नाशिक) उमेश साईनाथ बोंडे (टिटोली, इगतपुरी) या तीन तरुणांवर शस्त्र बंदी आदेश असताना शस्त्र बाळगल्याप्रकरणी (carrying a weapon) इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस (police) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com