'एटीएम' फोडणारे तिघे जेरबंद; एक फरार तर एकाचा अपघाती मृत्यू

घातक साहित्य जप्त
'एटीएम' फोडणारे तिघे जेरबंद; एक फरार तर एकाचा अपघाती मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास एटीएम मशीन फोडून चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांचा पाठलाग करताना घटनास्थळावरून पडून जाणारा संशयित याचा अपघात झाला. नंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, मात्र पोलिसांनी या संपूर्ण परिसरात केलेल्या कारवाईत एकूण पाच जण एटीएम चोरणारी टोळी असल्याचे समोर आले. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे तर एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हे सर्वजण परप्रांतीय असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, चार राऊंड फायर तसेच घातक कोयत्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. फरार आरोपीच्या शोधार्थ एक पथक मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाला आहे.

ही घटना सोमवारी (दि. ३) मध्यरात्रीच्या सुमारास किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली आहे. शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक येथील एच.डी.एफ.सी बँकेचे एटीएम मशीन, क्लासीक मोटार वॉशींग सेंटर, किशोर सुर्यवंशी मार्ग, म्हसरूळ, येथील एच.डी.एफ.सी बँकेचे ए.टी.एम मशीन व मखमलाबाद नाशिक येथील युनियन बँकेचे ए.टी.एम मशीन या ठिकाणचे एटीएम मशीन फोडुन त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने ऋशिकेश शरद आहेरराव (सुपरवायजर, ऍस्ट्रो सेक्युरिटी प्रा. लि.) यांनी दिलेल्या तक्रारी वरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गुन्हा घडतेवळी घटनास्थळी म्हसरूळ पोलीस स्टेशनची गाडी सायरन वाजवत तेथे आल्याने संशयीत आरोपीभेटेल त्या दिशने पळुन गेले. त्यांचा पोलीस पाठलाग करतांना अचानक त्यापैकी एक संशयीत पोलीस गाडीला धडकल्याने तो जखमी झाला. त्याला त्वरित उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाणेस अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

घटनेनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकला दिला. एटीएम चोरीचा प्रयत्न करून घटनास्थळावरून पळुन जाणा-या संशयीतांची माहीती घेत असतांना मिळालेल्या तांत्रीक माहीतीच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितनुसार गणेश नगर, मारुती मंदिरा शेजारी, तेजस अपार्टमेंन्ट म्हसरूळ, नाशिक या ठिकाणावरून संशयीत विरेंद्रकुमार फुलकरण चौधरी (वय-३३ वर्ष सध्या राह. तेजस अपार्टमेंन्ट, म्हसरूळ, नाशिक मुळ राह- गाव- अहरौला, पोस्ट- अमारेडिहा, तहसिल- भानपुर, जि. बस्ती, राज्य उत्तयादेश), धर्मेंद्र उर्फ राहुल रामनारायण पाल (वय ३३ वर्ष, सध्या राह. सदर मुळ राह- गाव- नरेंद्रपुर, तहसिल- लंम्बुआ, जि. सुलतानपुर, राज्य उत्तरप्रदेश) अमरकुमार रामदयाल चौधरी (वय-२८ वर्ष, सध्या राह. सदर मुळ राह- गाव- बाहरानपुर, तहसिल- भानपुर, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार अनिल उर्फ धुपकरण चौधरी व प्रशांत उर्फ छोटु पाठक यांचेसोबत केल्याची कबुली दिली आहे. गुन्हयाचे तपासात आरोपी विरेंद्रकुमार फुलकरण चौधरी याचे कडुन गुन्हा करतांना वापरलेले दोन देशी बनावटीचे पिस्तोल, ४ राउन्ड व कोयता असे हस्तगत करण्यात आले आहे. पोलीसांच्या गाडीला धडकुन गुन्हा करून पळुन जाणारा आरोपींचा साथीदार प्रशांत उर्फ छोटु रमेश पाठक असे असल्याचे निष्पन्न झाले. तर त्याचा मुख्य साथीदार अनिल चौधरी हा फरार आहे .

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com