परप्रांतीयाला मारहाण करून लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

परप्रांतीयाला मारहाण करून लूटमार करणाऱ्या तिघांना अटक

नाशिकरोड | Nashik

राजस्थानमध्ये (Rajsthan) राहत असलेल्या एका परप्रांतीय आला तुम्हाला चांगले व स्वस्तातले लॉज दाखवितो असे सांगून एका ठिकाणी नेऊन सदर परप्रांती यास मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम मोबाईल लुटून नेला. या घटनेनंतर नाशिक रोड पोलिसांनी (Nashikroad Police) तातडीने तपास करून तिघा युवकांना अटक (Youth Arrested) केली आहे.

संतोष कुमार अर्जुन लाल मीणा (२६, दौसा जिल्हा राजस्थान) हा प्रवासी नाशिकरोड येथे आला असता तो हॉटेल परिवार येथे उभा होता. याप्रसंगी तिघे जण मोटरसायकल (क्रमांक एमएच १५ सी इ ४५१९) या गाडीवर आले. त्यावेळी मीना याला म्हणाले की तुला चांगले व स्वस्त दरात असलेले दाखवितो असे म्हणून त्याचा विश्वास संपादन केला.

विहितगाव परिसरातील (Vihitgoan Area) वालदेवी नदी (Waldevi River) जवळ असलेल्या विठ्ठल मंदिराकडे नेले. यानंतर त्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 'तेरे पास क्या है, सब निकाल के हमे दे नही तो यही काटके नाली मे फेक देंगे' अशी धमकी दिली. या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व २२०० रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले.

दरम्यान या घटनेनंतर मीना याने नाशिक रोड पोलिस स्टेशन गाठले

आणि तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली (Senior Police Inspector Suraj Bijli) यांनी तातडीने गाडीच्या नंबरच्या आधारे तपास करून नदीम सलीम बेग (रा. विहितगाव), दीपक अशोक पताडे, शुभम दिलीप घोटेकर यांना तातडीने ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com