
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करत तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वैभव शरद कोहोक (रा.लासलगाव) याने पीडित महिलेला तू मला आवडतेस मला तुझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी दिली.
त्यानंतर (दि.६ डिसेंबर ) रात्री आठ वाजेच्या दरम्यान पीडित महिला घरी एकटी असताना तिच्या घरात बळजबरीने जात तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेवाळे करत आहेत.