सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांना धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोन युवकांवर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपंचायतीचे कामकाज सुरु असतांना एक वाजेच्या सुमारास आरोपी रुपेश कानडे व पुष्पक कानडे यांनी फिर्यादी मुख्याधिकारी हे लोकसेवक म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण करुन ते करु नये म्हणून मुख्याधिकारी यांचेवर हमला करुन शासकीय काम करण्यास रोखले असून त्यांची खाजगी कार क्रमांक एम.एच 12,एन.पी- 5369 या गाडीच्या बोनटवर तसेच दरवाजावर लाथा बुक्क्यांनी मारुन चेपून गाडीचे नुकसान केले आहे.

फिर्यादी येवले यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली आहे याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार झाला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.पुढील तपास स.पो.नि निलेश बोडके,ठाणे अंमलदार सदाशिव गांगुर्डे हे पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शना खाली तपास करीत आहेत.