किराणा दुकानातून 'इतक्या' हजारांचा गुटखा जप्त

किराणा दुकानातून 'इतक्या' हजारांचा गुटखा जप्त

पेठ | प्रतिनिधी | Peth

जिल्ह्यात कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा (Gutkha) पकडण्याची घटना ताजी असतांनाच दिंडोरी-पेठच्या सीमारेषेवरील ननाशी (Nanashi) येथे किराणा दुकानातून १३ हजार ८९० रुपये किंमतीचा गुटखा जप्त (Seized) करण्यात आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, गुटख्याची विक्री होत असल्याच्या गुप्त माहीतीवरून नाशिक ग्रामीणचे पो. कॉ. अमोल दवे यांनी ननाशी येथील पंचकृष्णा किराणा दुकानातून विमल पान मसाल्याचे १२० रुपये विक्री दर असलेली ७५ पाकीटे किंमत ९००० रुपये तर १९८ रुपये विक्री दर असलेली १२ पाकिटे किंमत २३७६ जप्त करण्यात आले.

तसेच ३६ रुपये विक्री दर असलेल्या तंबाखूची ७५ पाकीटे किंमत २२५० तर २२ रुपये विक्री दर असलेली १२ पाकीटे किंमत २६४ रुपये असा एकूण १३ हजार ८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) हस्तगत केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी सदर दुकानदाराविरुध भा.द.वि. कलम १८८, २७२ , २७३ प्रमाणे गुन्हा रजि. २०१ / २०२२ नुसार पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ह. पी.एस. राऊत करत आहेत .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com