नाशिक । Nashik

नाशिक शहरालगतचे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र गेल्या 43 वर्षांपासून कार्यरत असुन या केंद्रातून निघणार्या फ्लाय अॅश (राख)मुळे परिसरातील वायू, भूमी आणि जलप्रदूषणाचा प्रश्न कायम आहे.

असे असले तरी अलिकडे राखेच्या वीटांचा वापर शासकिय बांधकामांत करण्याच्या निर्णयामुळे आता औष्णिक विद्युत केंद्राची राखेचा वापर वाढल्याने भूमी प्रदुषण कमी होण्यास मदत होत आहे. यातच आता शहरात वाघ इंजिनीअरींग कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यानच्या उड्डाण पुलासाठी दररोज हजारो टन राखेचा वापर केला जात आहे.

एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातून दर महिन्याला एक लाखापेक्षा अधिक मेट्रिक टन राख बाहेर पडते. हवेमध्ये उडणारी व खाली राहणारी असे या प्रकल्पातील राखेचे दोन प्रकार आहेत. त्यात हवेमध्ये उडणारी राख 80 टक्के, तर 20 टक्के राख खाली राहणारी असते. दोन्ही प्रकारची राख साठवून त्याची विक्री होते. राखेची वाहतूक करतांना आवश्यक काळजी घेतली जात नसल्याने व हवेतील राखेचा रहिवाशांच्या आरोग्यावर होतो.

अशाप्रकारे गेल्या 43 वर्षापासुन एकलहरे केंद्रालगतच्या 60 फुटापेक्षा जास्त उंचीच्या वेस्टेज डॅममध्ये राख साठविली जात असुन या राखेची विक्री केली जाते. ठेकेदार कंपन्याकडुन आता राखेच्या विटा, ब्लॉक व इतर उत्पादनासाठी राखेचा वापर केला जात आहे. याचबरोबर आता राखेचा वापर उड्डाण पुलासाठी केला जात आहे.

शहरातील के. के. वाघ इंजिनिअरीयंग कॉलेज ते हॉटेल जत्रा या दरम्यानच्या पुलाचे भराव भरण्यासाठी दररोज हजारो टन राखेचा वापर केला जात आहे. अत्याधुनिक इंजिनीअरींगचा वापर केला जाऊन राखेचा भरावासाठी पुलाच्या ठेकेदार कंपनीकडुन या राखेचा वापर केला जात असल्याने या प्रदुषणकारी राखेमुळे एकलहरे भागातील भूमि प्रदुषण काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे.