पॉलिटेक्निकसाठी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज

पॉलिटेक्निकसाठी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (DTE) राबविण्यात येत असलेल्या दहावीनंतरच्या इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमांना (पॉलिटेक्निक) (Polytechnic) प्रवेश घेण्यासाठी नाशिक विभागातील (Nashik Division) १७ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक विभागात या अभ्यासक्रमाच्या २३ हजार ५४९ जागा उपलब्ध आहेत…

दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर सात सप्टेंबरपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती.

या काळात नाशिक विभागातील नाशिक (Nashik), धुळे (Dhule), जळगाव (Jalgoan), नंदुरबार (Nandurbar) व अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील १७ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले.

या पाच जिल्ह्यांमध्ये पॉलिटेक्निकच्या (Polytechnic) २३ हजार ५४९ जागा उपलब्ध असून, जागांच्या तुलनेत ७४.२० टक्के अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजे सुमारे २५ टक्के जागांसाठी अर्जच दाखल झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी नऊ सप्टेंबरला तर अंतिम गुणवत्ता यादी १३ सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे.

गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. १८ सप्टेंबरला पहिल्या यादीतील विद्याथ्र्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

या विद्यार्थ्यांना १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. दुसऱ्या फेरीसाठी २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. या फेरीचे जागा वाटप ३० सप्टेंबरला जाहीर केले जाणार आहे.

विभागातील अर्जाचा लेखाजोखा

  • नाशिक - ७,१३५

  • अहमदनगर - ५,४६६

  • जळगाव - २,५७१

  • धुळे - १,९००

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com