अन्नसुरक्षा विभागाकडून हजारोंचा गुटखा जप्त

अन्नसुरक्षा विभागाकडून हजारोंचा गुटखा जप्त

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

येथील नेहरू चौक भागातील एक गोडावूनवर अन्न सुरक्षा विभागाकडून (Department of Food Safety) छापा टाकून हजारोंचा गुटखा जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नेहरू चौक भागात सरस्वती पुलाजवळ असलेल्या भागातील श्रीलालचंद भानुदास बोडके यांच्या गोडावूनवर सायंकाळी छापा (raid) टाकण्यात आला.

यावेळी येथे 9 हजार 480 रुपयांचा वाह पानमसाला (Panmasala), 13 हजार 920 रुपयांचा आर. एम. डी. पानमसाला, 38 हजारांची एम नावाची सुगंधी तंबाखू (tobacco), 9 हजार 720 रुपयांचा हिरा पान मसाला, 2400 रुपयांची रॉयल 717 नावाची सुगंधी तंबाखू, 19440 रुपयांचा रजनीगंधा पानमसाला, 5 हजार 460 रुपयांची रॉयल 717 तंबाखु, 4 हजार 301 रुपयांचा केशरयुक्त पानमसाला, 7 हजार 128 रुपयांचा विमल पानमसाला,

8 हजार 280 रुपयांचा दुसरा पानमसाला, 2900 रुपयांचा व्ही. एक. नावाची सुगंधी तंबाखू, 1920 रुपयांचा राज निवास पान मसाला, 1100 रुपयांचा गोवा पानमसाला, 3600 रुपयांची मिराज नावाची सुगंधी तंबाखु असा एकूण 1 लाख 27 हजार 650 रुपयांचा अवैध गुटखा जप्त (Seizure of illegal Gutkha) करण्यात आला.

याप्रकरणी बोडके यांच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) संदीप शिवाजी देवरे (47) रा. नाशिक यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com