'ते' आधार आश्रम बंद करण्यात यावेत; माकपतर्फे मागणी

'ते' आधार आश्रम बंद करण्यात यावेत; माकपतर्फे मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक (nashik) शहरातील सुरू असलेल्या आधार आश्रमांची (Aadhaar Ashram) सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी

या आधार आश्रमांनी शासनाची योग्य अशी परवानगी घेतली नसल्यास ते आधार आश्रम बंद करण्यात यावेत.अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Marxist Communist Party) आज केली.

कम्युनिस्ट पक्षातर्फे माजी नगरसेवक कॉ. तानाजी जायभावे पक्षाचे शहर कमिटी सदस्य कॉ. संतोष काकडे, मोहन जाधव, नागेश दुर्वे, राहुल गायकवाड यांनी निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (Resident Collector Bhagwat Doiphode) यांना निवेदन (memorandum) दिले.

त्यात म्हटले आहे की, आधार तीर्थ आश्रमात चार वर्षे बालकाची गळा आवळून खुन (murder) केल्याची घटना ताजी असतानाच म्हसरूळ (mhasrul) मधील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात संस्था चालकाने 14 वर्षे शाळकरी मुलीला व्हिडिओ (video) दाखवत लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या (suicide) केलेल्या शेतकर्‍यांची (farmers) मुले तसेच छायाछत्र हरपलेली बालके यांची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com