‘त्या’ 12 कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

‘त्या’ 12  कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पश्चिम आफ्रिकेतील West Africa माली देशातून आलेला एक विदेशी नागरीक करोना पॉझिटिव्ह आढळल्याने हे नागरिक पाथर्डी फाट्याजवळील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेथील 12 कर्मचार्‍यांची करोना चाचणी Corona Test करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.या कर्मचार्यांची चार दिवसांनंतर पुन्हा करोना चाचणी केली जाणार आहे.

पश्चिम आफ्रिकेतील माली देशातून आलेला एक विदेशी नागरीक करोना पॉझिटिव्ह आढळल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. या विदेशी नागरिकासोबत आलेले अन्य दोघा विदेशी नागरिकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र हे विदेशी नागरीक पाथर्डी फाटा स्थित ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता त्या हॉटेलच्या कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने हॉटेलमधील सर्व 12 कर्मचार्यांची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आल्याने हॉटेल व्यवस्थापनासह पालिकेच्या वैद्यकीय विभागालाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

संशयामुळे रुग्णास स्वतंत्र कक्ष

करोना बाधित आढळलेल्या विदेशी नागरिकास नाशिकरोड येथील महापालिकेच्या नूतन बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाधिताच्या जिनोम सिक्वेन्सिंग साठी पुणे येथील विषाणू संशोधन संस्थेकडे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. सदर विदेशी नागरिकास ओमायक्रॉनची लागण असण्याची शक्यता असल्यामुळे त्यास बिटको रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले असून रुग्णालय कर्मचार्यांकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com