
लासलागाव | वार्ताहर | Laslagaon
नाशिक जिल्हा (Nashik District) हा प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे, येथील शेतकऱ्यांना नगदी पिक म्हणून कांदा अतिशय जिव्हाळ्याचे पिक वाटत असते. डाळिंब (Pomegranate) आणि द्राक्ष (grapes) शेतीच्या तुलनेत कमी खर्च आणि हमखास मोबदला या समीकरणातून कांदापिकाकडे बघितले जात होते; मात्र अलीकडे हवामानाची अनिश्चितता, बाजारभावाची (market price) अशास्वती यामुळे शेतकरी (farmres) पुरता हवालदिल झाला आहे.
यंदाही या कारणांनी शेतकऱ्याला कांद्याने रडवायला सुरु केले आहे. या हंगामात उन्हाळ कांदा (summer onion) पाठोपाठ लाल कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक फटका सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये (Lasalgaon Market Committee) लाल कांद्याला (Onion) किमान ६०० रुपये कमाल १५५२ रुपये, तर सरासरी ११५१ रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने परिणामी मोठ्या प्रमाणावर भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. उन्हाळ कांद्यानंतर आता लाल कांद्याला दर नसल्याने शेतकरी (farmer) हवालदिल झाले असून, यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक भागात कांदा लागवडी अडचणीत आल्या. त्यात वाढलेला उत्पादन खर्च, मजूरटंचाई (laborer) व कांदा काढणीपश्चात दरात झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनाचे गणित बिघडले आहे.
येथील मुख्य बाजार समितीत (Market Committee) लाल कांद्याची प्रचंड आवक होत आहे; मात्र मागणी घटल्याने कांदा कमी भावात विकावा लागत आहे. देशातून लाल कांद्याची निर्यात (export)सध्या अफगाणिस्तान, आखाती देश व दुबईमार्गे पाकिस्तान या ठिकाणी होत आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम या देशांत मागणी कमी झाली आहे. देशांतर्गत गुजरातमधील महूवा, भावनगर, गोंडल भागात आवक अधिक आहे. त्यामुळे दर अपेक्षित नसल्याचे व्यापारी प्रतिनिधींकडून बोलले जात आहे.