
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतातील नामवंंत दिग्दर्शक (Director), अभिनेते (actors) आणि नाट्यसमूहांची अनेक नाटके पाहण्याची अनोखी संधी देणारा
22 वा भारत रंग महोत्सव अर्थात भारंंगम यंदा नाशिक मध्ये 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. महाराष्टातुन यंदा फक्त नाशिकची (nashik) निवड या महोत्सवासाठी झाल्याने नाशिककरांना मोठी पर्वणीच यामुळे लाभली आहे.
बॉलीवूडमधील (Bollywood) ख्यातनाम दिग्दर्शक, नाट्य व्यक्ति देखील सहभागी होणार आहेत. या रंंग महोत्सवा मध्ये पारंपारिक आणि समकालीन नाटकांसोबतच लोकनाट्य (folk drama) आणि शास्त्रीय नाटकांचाही समावेश करण्यात आला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National School of Drama) तर्फे आयोजित नाट्य महोत्सव, 14 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. नाशिक मध्ये हा महोत्सव 18 तो 23 फे ब्रुवारी दरम्यान होणार आहे.
नाशिक महापालीकेच्या (Nashik Municipality) सौजन्याने महाकवी कालीदास कला मंंदीरात हा महोत्सव रंगणार आहे. संपूर्ण भारतामध्ये 81 नाटके सादर केली जातील. मुख्य स्थान दिल्ली असेल, जयपूर, भोपाळ, श्रीनगर, जम्मू, रांची, गुवाहाटी, नाशिक, राजामुंध्री आणि केवडिया येथे एकाच वेळी उत्सव आयोजित केले जातील.
कोविडमुळे, यावर्षी कोणताही परदेशी सहभागी होणार नाही. नाशिक मधील महोत्सवात कोण कोण कलाकार सहभागी होतील ते कोणती नाटके सादर करतील. हे लवकरच जाहीर केले जाईल. अंसे भारंंगमचे संयोजक सुरेश गायधनी यानी देशदुतशी बोलतांना साांगीतले.