जिल्हाभरात ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

जिल्हाभरात ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हाभरात महिला दिनानिमित्त (women's day) ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान (Awareness campaign) प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आरोग्य विभागाच्या (Department of Health) पीसीपीएनडीटी (PCPNDT) व राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम (National Tobacco Control Programme) व तंबाखु नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समितींच्या आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal),

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) सुनिल राठोड, डॉ. अनंत पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भागवत फुलारी, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या उज्ज्वला पाटील यांच्यासह ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, लेक वाचवा, लेक वाढवा या अभियानाची जिल्हाभरात अंमलबजावणी करतांना आरोग्य विभागासोबतच (Department of Health) शिक्षण (education), महिला व बालविकास (Women and Child Development) या विभागांचे सहकार्य घेण्यात यावे. यावेळी पीसीपीएनडीटी समितीच्या कामाचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, या समितीच्या अंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टिने आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावपातळीवर गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

त्यातील पहिले अपत्य मुलगी असेल अशा गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्वेक्षण केलेल्या गर्भवती महिलांच्या प्रसूतीबाबत देखील सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच नोंदणी नसलेल्या सोनोग्राफी सेंटर्सची माहिती घेवून त्यांच्यावर देखील निगराणी ठेवण्यात यावी, जेणेकरून अनोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्सच्या माध्यमातून गर्भलिंग निदान होणार नाही. ज्या सोनोग्राफी सेंटर्सवर गर्भलिंग निदान होत असल्याचे आढळून आल्यास त्या सेंटर्सवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

या बैठकीच्या सुरूवातीला राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व तंबाखु नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने वर्षभरात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, चांदवड, पेठ, कळवण व सुरगाणा हे सहा तालुके तंबाखुमुक्त झाले आहेत. तसेच एप्रिल, 2022 ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीत जिल्ह्यातील साधारण 500 शाळांमध्ये तंबाखुमुक्त शालेय अभियान राबविण्यात आले असल्याचे सांगितले. यासोबतच पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची व लेक वाचवा, लेक वाढवा या अभियानाच्या जनजागृतीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांनी माहिती सादर केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com