
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रशासकीय राजवटीत का होईना नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) मराठी अस्मिता जागी झाली असून, महापालिका आणि राष्ट्रीय विकास मंडळ (National Development Board) संचलित नववर्ष स्वागत यात्रा समिती,
नाशिकच्या संयुक्त विद्यमाने मराठी नववर्ष (Marathi New Year) गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) 18 ते 22 मार्च या दरम्यान गोदाघाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी दहा लाख रुपयांच्या खर्चास महासभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकतर्फे दरवर्षी गोदाघाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे (cultural events) आयोजन केले जाते.
या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले जाते. यावर्षी ’पर्यावरण रक्षण’ (Environment Protection) या थीमवर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव समितीच्या वतीने महापालिकेला सादर करण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेच्या 12 वी अनुसूचीमध्ये नगरपालिकांचे अधिकार आणि जबाबदार्या निर्देशित करण्यात आल्या आहेत.
अनुसुचिमध्ये समाविष्ट 18 बाबींपैकी बाब क्र. 13 मध्ये सांस्कृतीक, शैक्षणिक आणि सौदर्यात्मक पैलूंना प्रोत्साहन देणे याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या तरतुदीचा आधार घेत येत्या 22 मार्च रोजी साजर्या होण्याच्या गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थात मराठी नववर्षानिमित्त गोदाघाटावर आयोजित केल्या जाणार्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या उपक्रमासाठी दहा लाख रुपयांच्या निधीला महासभेने मंजुरी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये गोदावरी नदीचे (godavari river) पावित्र कशा प्रकारे राखावे व ते जपण्याकरीता नागरिकांमध्ये जनजागृती करता येईल. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 (Clean Survey 2023) च्या अनुषंगाने नागरिकांना आपले शहर स्वच्छ, सुंदर व हरीत राखून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागरिकांचा सहभागा सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त गोदाघाटावर 18 ते 22 मार्च या दरम्यान गोदाघाटावर पर्यावरण रक्षण, स्वच्छ सर्वेक्षण या विषयांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रांगोळी स्पर्धा, महावादन स्पर्धा, अंतर्नाद स्पर्धा, मर्दानी खेळ स्पर्धा आदींचा समावेश असणार आहे. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रोत्साहनपर पूरस्कार दिले जाणार आहेत.