'या' पोलीस ठाण्याचे होणार विभाजन; लवकरच मान्यता

'या' पोलीस ठाण्याचे होणार विभाजन; लवकरच मान्यता

नविन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलीस ठाण्याचे ( Ambad Police Station) विभाजन करून लवकरच नविन पोलीस ठाण्याला मान्यता मिळविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार सिमा हिरे ( MLA Seema Hire )यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

नाशिक पश्चिम मतदार संघातील अंबड मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे सहाजिक कामगार वर्ग तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय राज्यातून व परराज्यातुन मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या निमित्ताने अनेक सुशिक्षित बेरोजगार याठिकाणी वास्तव्यास येत आहे. मतदार संघात विशेषत: नविन नाशिक व अंबड या परिसरामध्ये दरोडे,खुन, वाहन जळीत कांड, रोडरोमियोंकडून होणारा त्रास अशा प्रकारचे गुन्हे हे सातत्याने घडत आहे. त्यामुळे येथिल नागरीकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.

मोरवाडी, कामटवाडे, चुंचाळे, अंबड हा शहरातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेले हे अंबड पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे सहाजिक मर्यादित पोलिस बळ, पोलिस यंत्रणेवर येणारा ताण या सर्व बाबीचा विचार करता अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करुन नविन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून अनेक दिवसापांसुन त्याचा पाठपुरावा आ.सीमा हिरे यांनी केला आहे.

अंबड एमआयडीसीतील निमा, आयमा या संस्थानीही तसेच उद्योजकांनी देखील आमदार हिरे यांना मागणी केलेली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नविन पोलिस स्टेशनला लवकरच मान्यता देणार असून लवकरच तांत्रिक बाबींची पुर्तता पूर्ण होवून कामास सुरुवात होणार असल्याचे हिरे यांनी सांगितले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com