थकबाकी वसुलीसाठी मनपा आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

थकबाकी वसुलीसाठी मनपा आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे ( NMC ) उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणजे पाणीपट्टी( Water Bills ), घरपट्टी( House Tax ) आहे. मात्र मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढतच आहे. यामुळे महापालिकेला विकास कामे करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी विशेष लक्ष दिले असून त्यांनी महापालिकेच्या सर्व विभागीय अधिकार्‍यांना आपल्या भागातील टॉप टेन थकबाकीदारांची यादी तयार करून करण्याचे आदेश देऊन विभागीय अधिकार्‍यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन वसुली करावी, गरज पडली तर त्यांच्या घराजवळ ढोल वाजून महापालिकेची वसुली करा, असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे.

घरपट्टी व पाणीपट्टीची अपेक्षित थकबाकी वसूल होत नसल्याने उद्दिष्टपूर्तीसाठी कर विभागाने वसुलीसाठी कामाला लागावे, असे आयुक्तांनी आज महापालिकेत झालेला आढावा बैठकीत सांगितले. महापालिकेकडून मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. या वर्षीदेखील दीडशे कोटींचे उद्दिष्ट आहे. मात्र जवळपास 82 कोटी रुपये मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरी आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

ही रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेला सवलत योजनाही राबवावी लागली आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वेळोवेळी घर व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतला आहे. दरम्यान मनपाची एकूण 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले 3245 थकबाकीदार असून थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी अंतिम नोटिसा देखिल बजावण्यात आल्या आहेत.

त्यास अपेक्षित उत्तर मिळात नसल्याने थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वादन होत असताना त्याचे छायाचित्रण देखील केले जाणार असून, जिओ टॅगिंग केली जाणार आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले एकूण 3245 थकबाकीदार शहरात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com