नवरात्रोत्सव : दांडिया, गरबावर बंदीच...!

पोलीस यंत्रणा सज्ज
नवरात्रोत्सव : दांडिया, गरबावर बंदीच...!

नाशिक । Nashik

नवरात्रोत्सवासाठी नाशिक शहर तसेच जिल्हा ग्रामिण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनीक तसेच घरगुती उपक्रमाबाबत नवरात्रोत्सवासाठी नियम असणार आहेत. यामुळे सर्वांचे आकर्षण असलेले दांडिय, गरबा व संस्कृती कार्यक्रमांवर बंदी असणार आहे.

प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ताचे नियोजन असून शहरासह जिल्ह्यातील प्रमुख देवी मंदिरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी (दि.17) घटस्थापना होऊन नवरात्रोस्तवास प्रारंभ होत आहे. मंदिरे बंद असल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सवास यंदा मर्यादा आली आहे. गरबा, दांडिया यांचे आयोजन होणार नसून, गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची जबाबादारी पोलिस ठाण्यांकडे देण्यात आली आहे.

नाशिकची ग्रामदैवत कालीकामाता, भगुरची रेणुका, वणी येथील सप्तशृंगीमाता, चांदवडची रेणुका माता यासह सर्व देवीमंदिरांमध्ये होणारे यात्रात्सोव रद्द करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना सुरू आहे.

दरम्यान मंदिरे बंद राहणार असली तरी सुरक्षा उपाययोजना म्हणून शहरातील ग्राम दैवत असलेल्या कालिका मंदिरासह भगूरच्या रेणुका माता मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्ह्यात सप्तश्रृंगी देवी मंदिर, कोटमगाव, चांदवड या भाविकांवचे श्रद्धासान असलेल्या मंदिरांमध्ये दरवर्षी नवरात्र उत्सव उत्सहात साजरी करण्यात येते.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती असते. या पार्श्वभूमीवर गरबा दांडीयांचे आयोजन, सार्वजनिक नवरात्रोत्सव, मुर्तीची उंची आदी बाबींकडे पोलिसांनी लक्ष पुरविले आहे.

नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी शासनाकडून आलेले निर्देश पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधिक्षकांना दिले असून, या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सर्व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना पोलीस दलास केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com