ऑनलाइन साहित्य संमेलनाबाबत स्वागत मंडळाची 'ही' भूमिका

ऑनलाइन साहित्य संमेलनाबाबत स्वागत मंडळाची 'ही' भूमिका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona Second Wave) तात्पुरते स्थगित करण्यात आलेले संमेलन ऑनलाइन (Online) नकोच ऑफलाईनच (Offline) व्हावे, असा सूर स्वागतमंडळ आणि साहित्य महामंडळाच्या चर्चेत निघाला आहे....

स्वागत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज औरंगाबाद (Aurangabad) येथील साहित्य महामंडळाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील (Kautikrao Thale-Patil), कार्यवाह डॉ. दादा गोरे (Dr. Dada Gore) आणि कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुखे (Dr. Ramchandra Kalukhe), स्वागतमंडळाचे प्रमुख कार्यवाह व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर (Jaiprakash Jategaonkar) आणि स्वागतमंडळाचे समितीप्रमुख विश्वास ठाकूर (Vishwas Thakur), स्वागतमंडळाचे कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे (Dr. Shankar Borhade), लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर (Dilip Salvekar), संजय करंजकर (Sanjay Karanjkar), सुभाष पाटील (Subhash Patil), सदस्य विनायक रानडे (Vinayak Ranade) उपस्थित होते.

ऑनलाईन संमेलन घेणे स्वागतमंडळाच्या विचाराधीन नाही. साहित्य संमेलन नाशिककरांसाठी घ्यावयाचे असल्याने त्याचा लाभ साहित्य रसिकांना घेता येईल अशी साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचीही भूमिका आहे.

संमेलन जेव्हा घेऊ तेव्हा ते उत्तमच घेऊ तसेच साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदी व प्रकाशक विक्रेत्यांना पुस्तक विक्रिचा लाभ घेता यावा तसेच लेखक-वाचकांच्या गाठीभेटी व्हाव्यात अशी साहित्य महामंडळाची व स्वागतमंडळाची निर्विवाद भूमिका आहे. त्यादृष्टीने हे संमेलन ऑनलाइन न होता नेहमीप्रमाणेच व्हावे, असा साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचाही प्रयत्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, करोनाची (Corona) परिस्थिती लक्षात घेऊन करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेता येईल, संमेलनाच्या तारखा आजच सांगणे अशक्य आहे. मात्र, संमेलन फार पुढे जाणार नाही याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल यासाठी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी देखील चर्चा करून साहित्य संमेलन लवकर घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करू, असे स्वागत मंडळाने सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com