'हि' संस्था उघडणार सुकन्या समृद्धी योजनेचे खाते; 'इतक्या' वर्षांपर्यंत करणार रक्कम जमा

'हि' संस्था उघडणार सुकन्या समृद्धी योजनेचे खाते; 'इतक्या' वर्षांपर्यंत करणार रक्कम जमा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गुरुवर्य राहणे बाबा संस्थेने (Guruvarya Rahne Baba Sanstha) एक अभिनव उपक्रम राबवून समाजात नवा आदर्श उभा केला आहे. एखाद्या संस्थेची धोरणात्मक दूरदृष्टी विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत किती मोलाचे बदल करू शकते याचा उत्तम संदेश या संस्थेने दिला आहे.

पाच मुलींचे 'सुकन्या समृद्धी योजनेचे' (Sukanya Samriddhi Yojana) खाते उघडून 15 वर्षापर्यंत ठराविक रक्कम जमा करण्याचा निर्धार गुरुवर्य राहणे बाबा सेवा संस्थेने केला आहे. पुढील पंधरा वर्षे संस्थेमार्फतच दर महिन्याला या खात्यांमधला भरणा करण्यात येणार आहे.

उच्च शिक्षणासाठी तसेच विवाह कार्यासाठी एक चांगली अशी रक्कम जमा होऊन त्या मुलींच्या पालकांना पुढील आयुष्यात तिचा लाभ होईल आणि त्यांच्या लेकीच्या चांगल्या आयुष्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ लाभेल हा उद्देश ठेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी नाशिक डाक विभागाचे (Nashik Postal Department) प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com