पोलीस भरतीची 'हि' परीक्षा लांबली

पोलीस भरतीची 'हि' परीक्षा लांबली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण पोलीस भरतीच्या (Rural Police Recruitment) मैदानी चाचणीनंतर (Field test) लेखी परीक्षेसाठी (Written Examination) पात्र ठरलेल्या उमेदवारांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मैदाणी चाचणीनंतर राज्यात एकाचवेळी लेखी परीक्षा (Written Examination) घेतली जाणार होती. मात्र, पुणे (pune) येथील भरती प्रक्रिया (Recruitment process) फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने नाशिकच्या मैदानी चाचणीत यशस्वी झालेल्या एक हजार ८६१ उमेदवारांना लेखी परीक्षेच्या तयारीसाठी वाव मिळणार आहे. नाशिक ग्रामीणच्या (rural area) १६४ शिपाई पदासाठी दि. २ ते २० जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी पूर्ण झाली.

या मैदानी चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांचे सामाजिक, समांतर आरक्षण (reservation) व त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद पोलिसांनी केली. यासंदर्भात काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यावर पडताळणी करुन या दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यासंदर्भात ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने दि. ३० जानेवारी व दि. १० फेब्रुवारी रोजी अहवाल ई-स्वरूपात प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार मैदानी चाचणीत ज्या उमेदवारांनी किमान ५० टक्के गुण मिळवले आहेत.

या उमेदवारांतून एका रिक्त पदासाठी (vacancies) दहा उमेदवार, यानुसार लेखी परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम लेखी परीक्षेसाठी अठराशे उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र, राज्यभरात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तूर्तास बृहन्मुंबई, पुणे व इतर ठिकाणची मैदानी चाचणी सुरू आहे. तर, निवडणुकांमुळे पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे व बृहन्मुंबईतील मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झाल्यावर लेखी परीक्षेचा निर्णय घेतला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com