नाशकातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत झाला 'हा' निर्णय

नाशकातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत झाला 'हा' निर्णय

नाशिक | Nashik

गेल्या सात दिवसांपासून गणपती बाप्पा विविध मंडळांसह घरोघरी विराजमान झाले असून येत्या शुक्रवारी (दि.९) उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आज गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणुकीच्या नियोजनासाठी मनपा, पोलिस प्रशासन (Police Administration) गणेश मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) पार पडली. या बैठकीत मिरवणुकांच्या मार्गासोबतच नियमावली निश्चित करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वाकडी बारव येथून मिरवणुकांना सुरुवात होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून गंगेवर या मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे. तसेच आजच नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) माध्यमातून मिरवणूक (Procession) मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

याशिवाय यंदा प्रथमच सकाळी ११ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून ती रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूकीत धुमशान पाहायला मिळणार आहे. या बैठकीस २१ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, यावर्षी मिरवणूक पारंपरिक पद्धतीने वाद्य आणि ढोल ताश्याच्या गजरात निघणार असून मिरवणुकीला उशीर केल्यास गुन्हे दाखल (Case filed) होणार आहेत. तर लाईट असलेले मंडळ शेवटी राहणार असून स्वागत करण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाणे टाळावे, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com