इंडोनेशियातील ‘ही’ कंपनी करणार नाशिकमध्ये उद्योग विस्तार

इंडोनेशियातील ‘ही’ कंपनी करणार नाशिकमध्ये उद्योग विस्तार

नाशिक | निशिकांत पाटील

इंडोनेशियातील (Indonesia) पिटी बेनुआ ग्रीन एनर्जी या कंपनीने त्यांच्या उद्योगाचा पुढील विस्तार नाशिकमध्ये  करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.

इंडोनेशिया येथील कायम रहिवासी व पिटी बेनुआ ग्रीन एनर्जी (PT Benua Green Energy) कंपनीचे संचालक डी रवि, व कंपनीचे भारतातील व्यवसाय विकासक सचिन पाटील यांनी नाशिक दौऱ्यात निमा कार्यालयात भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. 

इंडोनेशियातील ‘ही’ कंपनी करणार नाशिकमध्ये उद्योग विस्तार
छगन भुजबळांनी वाचला मुंबईच्या प्रश्नांचा पाढा

या कंपनीचा सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया (Singapore, Indonesia, Malaysia) येथे उद्योग आहे. आमच्या कंपनीचा पुढील विस्तार आम्हाला भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात करावयचा आहे, इंडोनेशिया व चायनाचे असलेले संबंध पाहता, चायना मधून घेत असलेले उत्पादने महाराष्ट्र आणि नाशिक मध्ये काही मिळू शकतील अशी माहिती यावेळेस बेळे यांनी दिली.

एनर्जीशी संबंधित त्यांचे उत्पादन असल्यामुळे नाशिकमध्ये होत असलेली सीपीआरआय टेस्टिंग लॅब तसेच नाशिक मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमेशनच्या, कंपन्यांची विस्तृत माहिती उपस्थित उद्योजकांनी (entrepreneurs) व पदाधिकाऱ्यांनी त्यांना करून दिली.

इंडोनेशियातील ‘ही’ कंपनी करणार नाशिकमध्ये उद्योग विस्तार
लाल वादळाची सरकारने घेतली दखल; कांद्याच्या अनुदानात ५० रुपयांच्या वाढीसह अनेक मागण्या मान्य

यावेळी  डी रवी यांनी आम्ही आता अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे (Advance technology) मशिनरी घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करून त्याद्वारे आमचे उत्पादन बनवून घेऊ किंवा एखाद्या कंपनीशी जॉईंट वेंचर सुद्धा आम्ही करू शकतो तसेच आम्हालाही स्वतःचा आमचा इथे कारखाना उभारायचा आहे असे  सांगितले. त्यासाठी आम्ही जागेचा शोध घेत आहोत असे डी.रवी  यांनी निदर्शनास आणले असता धनंजय  बेळे यांनी त्यांना नाशकात हा विस्तार करावा अशी त्यांना  गळ घातली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक मध्ये उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण आणि हवामान आहे. येथे कुशल मनुष्यबळ तसेच प्रशस्त जागाही उपलब्ध होईल. दळणवळणाच्या दृष्टीने नाशिकचा राज्यात अग्रक्रम लागतो. येथे एअर कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला येथे कोणतीच अडचण येणार नाही. नाशकात तुम्ही विस्तार केल्यास नाशिककरांच्यादृष्टीने  ही बाब निश्चितच भूषणावर ठरेल, असे बेळे यांनी पटवून दिले असता डी रवि (D Ravi) यांनी नाशकात उद्योगाचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी  निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे, खजिनदार विरल ठक्कर, कार्यकारी सदस्य व स्टार्टअपचे मेंटोर श्रीकांत पाटील, गोविंद झा, सी.एस.सिंग, संजय सोनावणे, ऋग्वेद काठे, आदी उद्योजक उपस्थित होते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com