
नाशिक । Nashik
झाडावर आंबे तोडण्यासाठी (mangoes tree) गेलेल्या एका युवकाला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू (Death by electric shock) झाल्याची घटना इंदिरानगर (Indiranagar) परिसरातील राजसारथी सोसायटीत (Rajsarathi Society) घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) (Aniruddha Anil Dhumal) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत युवक हा सकाळी सात वाजेच्या सुमारास आजोबांच्या घरी झाडावरील आंबे पाडण्यासाठी आला होता.
तो शिडीच्या सहाय्याने एका लोखंडी पाईपने आंबे पाडत होता. त्यावेळी आंब्याच्या झाडाजवळ विजेची तार असल्याने त्या तारेला लोखंडी पाइप लागल्याने अनिरुद्ध याला वीजेचा जोरदार धक्का बसला.
या वीजेच्या धक्क्याने (electric shock) तो झाडावरून खाली फेकला गेल्याने त्याच्या दोन्ही पायाला, पोटाला दुखापत झाल्याने वडीलअनिल धुमाळ यांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्याची तपासणी केली असता त्यास मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात (Indiranagar police station) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.