तीन मजली इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

तीन मजली इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

तीन मजली इमरतीच्या बांधकामावरून पडून मजुर ठार झाल्याची घटना घडली. नागेंद्र ओमप्रकाश चव्हाण (३२, रा. तिरूपतीनगर, नाशिकरोड) असे या घटनेत
मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे...

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरात तीन मजली ईमारतीचे बांधकाम सुरू होते. दुसर्‍या मजल्यावर काम करत असताना सोमवारी सकाळी चव्हाण याचा तोल जाऊन तो खाली पडला.

त्यास तातडीने जिल्ह रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com