
नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यांवर फिरून संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरात सुमारे ३१ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. यामुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली असली तरी आवश्यक सेवांसाठी बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र सर्वच दुकाने सुरू झल्याने अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तुंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस अद्यापही कारवाई करीत आहेत.
राज्यात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेे आहेत. प्रारंभी नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर सर्व व्यावसाय सुरू आहेत. तर अनेक नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करुन शहरात वावरत असतात. त्यामुळे अशा नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या अतंर्गत २३ मार्च ते २५ जुलै पर्यंत एकुण ३१ हजार २३० जणांवर दाखल करण्यात आले आहेत.
तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तरीदेखील काही नागरिक मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार आतार्पंत शहरात १५ हजार १६३ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.