
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्मार्ट सिटिकडे (Smart City) वाटचाल करताना नाशिक महापालिकेद्वारे (Nashik NMC) तेरा फाईव्ह स्टार टॉयलेट (Five star toilet) उभारण्यात येणार होते. त्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) निधी प्राप्त झाला नाही. सीएसआरअंतर्गत निधी प्राप्त करण्यात महापालिका घनकचरा संकलन विभागाला अपयश आल्यामुळे या प्रकल्पाला मुहूर्तच लाभला नाही. निधी अभावी हा बहुउद्देशीय प्रकल्प गुंडाळला जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. फाईव्ह स्टार टॉयलेट उभारुन बंगळुरु, मुंबई या जागतिक शहरांच्या पंक्तीत बसण्याचे नाशिक मनपाचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता वर्तवली जात आहे...
शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने फाईव्ह स्टार टॉयलेटची संकल्पना अंमलात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अडीच लाख निधीही उपलब्ध करुन दिला जाणार होते. नाशिक महापालिकेनेही या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेत शहरात तेरा ठिकाणी सुलभ शौचालयाच्या माध्यमातून फाईव्ह स्टार टॉयलेट उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता.
शहरातील पॉश ऐरिया समजल्या जाणार्या गंगापूर रोड येथे पहिले टॉयलेट उभारण्यात येणार होते. तसेच राजीव गांधी भवन, कृषी नगर जॉगिग ट्रक, बिटको रुग्णालय, मनपाचे मुख्यालय राजीव गांधी भवन या ठिकाणांची निवड करण्यात आली होती. या संकल्पनेंत वेंडिंग मशीन, कॅफेटेरिया यांसह आणखी काही सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार होत्या. त्यासाठी वापर कर्त्यांकडून ठाराविक शुल्कही आकारले जाणार होते.
या संकल्पनेला एक वर्ष होत आलेला आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून त्यास निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध होत नसल्याने महापालिका घनकचरा संकलन विभागाने शहरातील उद्योजकांकडून सीएसआर फंडातून निधीची मागणी टॉयलेट उभारणीसाठी करण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुलभ शौचालय प्रतिनिधींनी उद्योजक प्रतिनिधींना या प्रोजेक्टचे सादरीकरणही केले होते. पण त्यानंतर याबाबत फारसा पाठपूरावा जाला नाही की उद्योजकांमद्ये निरुत्साह दिसून आला याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.