तिसरा श्रावणी सोमवारही भाविकांविना सुना

तिसरा श्रावणी सोमवारही भाविकांविना सुना
ब्रम्हगिरी प्रदक्षिणा

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

आज तिसरा श्रावणी सोमवार (Shravni Somwar) असल्याने ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर (Bramhagiri) संचारबंदी लागू आहे. त्यामुळे तिसऱ्या सोमवारी देखील प्रदक्षिणा मार्ग सुना सूना असणार आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात (Trimbakeshwer Area) श्रावण महिन्यात ब्रम्हगिरी फेरीसाठी लाखो भाविक येतात. परंतु गत वर्षांपासून कोरोना काळ (Corona Crisis) असल्याने या फेरीला मज्जाव करण्यात आला आहे. दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवार ला विशेष महत्व असते. त्यामुळे आज असणाऱ्या श्रावणी सोमवार भाविकांना साजरा होणार आहे.

त्र्यंबकेश्वर हे जोतिर्लिंग व संत निवृत्तीनाथ महाराज समाधी (sant Nivruttinath Maharaj Mandir) आदींसह विविध धार्मिक पर्यटकांसाठी ओळखले जाते. त्यात ब्रम्हगिरी फेरीमुळे अधिकधिक भाविक या ठिकाणी भेटी देत असतात.

यामुळे येथील स्थानिकांना महिनाभर रोजगारही मिळतो. त्याचबरोबर निसर्गाचा आनंदही पर्यटकांना (Tourists) , भाविकांना घेता येतो. परंतु अद्यापही कोरोनाचा काळ संपला नसल्याने येथील परिसरात संचारबंदी लागू आहे. त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com