Nashik : चोरट्यांचा धुडगूस; चार ते पाच दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

Nashik : चोरट्यांचा धुडगूस; चार ते पाच दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या पळसे गावात (Palase village) बुधवारी पहाटेच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी (Thieves) गावातील महामार्गावर असलेली चार ते पाच दुकाने फोडून दोन ठिकाणी घरपोडी करत सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराट (Panic) निर्माण झाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, पळसे गावात राहणारे भास्कर पुंजाजी शिंदे यांचे मयूर किराणा स्टोअर्स व मधुकर शिवाजी पगार यांचे इच्छामणी किराणा आणि एका बँकेचे एटीएम फोडत दोन ते तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी (Burglary) करत दुकाने फोडले असून या दुकानांतील काही रोख रक्कम तसेच घरातील सोन्याचे दागिने असा अंदाजे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

Nashik : चोरट्यांचा धुडगूस; चार ते पाच दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास
Video : निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन; त्र्यंबक नगरी दुमदुमली

तसेच सकाळी गावात दुकाने व घरफोडी झाल्याचे समजताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.त्यानंतर पळसे गावचे माजी सरपंच नवनाथ गायधने, किरण चंद्र मोरे, मधुकर पगार, मयूर शिंदे, भास्कर शिंदे, अनिल आगळे, यांच्यासह आदी नागरिकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना (Police)दिली.

दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तक्रार नोंदविण्याचे काम सुरू असून एकाच वेळी चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी चोऱ्या केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करत आहेत. तर रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Nashik : चोरट्यांचा धुडगूस; चार ते पाच दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास
राहुड घाटात 'द बर्निंग' बसचा थरार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com