
पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
जिल्ह्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ (Onion Market) असलेल्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील चिंचखेड चौफुलीवरील एटीएम (ATM) फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २८ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली (Chinchkhed Chauphuli) हा अत्यंत गजबजलेला परिसर असून या ठिकाणी आज शनिवार (दि.२६) रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी याठिकाणी असणारे एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) एटीएम फोडून त्यातून तब्बल २८ लाख रुपये चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, चोरट्यांनी (Thieves) एटीएम फोडण्यासाठी कटरचा वापर केला असून चोरी करण्यासाठी महागड्या गाडीचा (Car) वापर केल्याची माहिती मिळत आहे. तसेच चार चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे.