विदेशी मद्याच्या बाटल्या लंपास

विदेशी मद्याच्या बाटल्या लंपास

वावी | वार्ताहर |Wavi

येथील सिन्नर-शिर्डी हायवेवर (Sinner-Shirdi Highway) असणाऱ्या साईप्रसाद परमिट रूम अँड बियर बारच्या मागच्या बाजूस मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत विदेशी मद्याच्या (Foreign Liquor) तब्बल २५ बॉटल (खंबे) लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे...

याबाबत हॉटेल चालकांने दिलेल्या माहितीनुसार, वावी येथे सिन्नर शिर्डी नॅशनल हायवेचे काम मोठ्या प्रमाणावर दिवस-रात्र सुरु असून या कामाचा अडोसा धरून बुधवार (दि.१६) रोजी मध्यरात्री चोरट्यांनी (Thieves)मागील बाजूच्या एका खिडकीचे (Window) ग्रील तोडून लाकडाचे दांडके व लोखंडी साहित्याचा वापर करून बियर बार व परमिट रूममध्ये प्रवेश केला.

त्यानंतर चोरट्यांनी २०० एम एल अथवा ५०० एम एलच्या कुठल्याही बॉटलला हात न लावता ७५० एम एलच्या अंदाजे १५ ते २० बॉटल (खंबे) चोरून नेल्या असून त्यांची किंमत साधारण ३० ते ४० हजार रुपये असल्याचे बार मालकाने सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्याचे (Wavi Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com