घरफोडी करणारे मुद्देमालासह ताब्यात

घरफोडी करणारे मुद्देमालासह ताब्यात

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

शहरातील मध्यवस्तीत धाडसी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज तसेच कॅम्प भागातून दुचाकी चोरून फरार झालेल्या चौघा चोरट्यांना मालेगाव व औरंगाबाद येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून दुचाकीसह तीन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरट्यांच्या टोळीस पकडण्यात आल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे

आयेशानगर भागातील अन्सार कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या मोहम्मद शफी शेख बिस्मिल्ला हे कुटुंबीयासमवेत 28 जून 2022 रोजी बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाट फोडून सोन्या चांदीचे दागिने महागडी घड्याळे व मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा सुमारे सात लाख 35 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता याप्रकरणी मोहम्मद शफी यांच्या फिर्यादीवरून आयेशानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता याच दरम्यान कॅम्प भागातून दुचाकी चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती

शहरातील घोरपडी व दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासा संदर्भात निर्देश दिले होते गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक हेमंत पाटील, संदीप पाटील यांच्यासह पोलीस पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवीत चोरट्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता.

यावेळी पथकास मिळालेली गुप्त माहिती व तांत्रिक पुराव्यावरून पोलिसांनी अन्सारी अनीस अहमद हबीउल्ला वय 32 राहणार दरेगाव शिवार, मुदसिर जमील अहमद वय 27 राहणार नुरबाग म्हाडा कॉलनी, आसिफ अंजुम राशिद अहमद वय 27 राहणार हुडको कॉलनी,, यांना मालेगावातून तर शेख रफिक शेख पाशा वय 38 राहणार रहमान नगर यास औरंगाबाद येथून ताब्यात घेतले या चौघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोरलेल्या दुचाकी सह घरफोडीत लंपास केलेल्या सोने चांदीचे दागिने महागडी घड्याळ व मोबाईल असा सुमारे तीन लाख 79 हजाराचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला या चौघा चोरट्यांना आयेशानगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com