वृद्ध महिलेची सोन्याची पोत ओरबाडून चोरटे फरार

वृद्ध महिलेची सोन्याची पोत ओरबाडून चोरटे फरार

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

वस्तू खरेदी करण्याकरता रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेची चार तोळे वजनाची व सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकी गाडीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून चोरटे फरार झाल्याचा प्रकार उपनगर येथील मातोश्रीनगर परिसरात घडला...

शांताबाई अरविंद रोकडे (रा. प्रगती कॉलनी, किनारा बंगला, भाजीपाला मार्केटच्या पाठीमागे, उपनगर, नाशिकरोड) या आपल्या पतीसोबत उपनगर येथील जलाराम अपार्टमेंट समोर महापालिका गार्डन शेजारून पतीसोबत वस्तू खरेदी करता जात होत्या.

शांती पार्क रोड कडून पल्सर गाडीवर दोन चोरटे आले व त्यांनी शांताबाई रोकडे यांच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून चोरून नेली.

वृद्ध महिलेची सोन्याची पोत ओरबाडून चोरटे फरार
'पुण्याहून पुणतांबा'! स्पाईस जेट विमानसेवेचा अजब कारभार; वाचा सविस्तर

त्यानंतर सदरचे चोरटे महाराष्ट्र हायस्कूलच्या दिशेने सुसाट वेगाने फरार झाले. दरम्यान या घटनेनंतर चोरट्यांना पकडण्यासाठी रोकडे पती पतीने आरडाओरड केली. परंतु चोरटे फरार होण्यास यशस्वी झाले.

वृद्ध महिलेची सोन्याची पोत ओरबाडून चोरटे फरार
नाशकात किरकोळ कारणावरून एकाचा खून

या घटनेनंतर शांताबाई रोकडे यांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठले व दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com