येवला : अवघ्या २४ तासात चोरटे जेरबंद

येवला : अवघ्या २४ तासात चोरटे जेरबंद

येवला | Yeola

मनमाड येथील सराफ व्यावसायीक संतोष दत्तात्रय बाविस्कर हे येवला तालुक्यातील कातरणी, विसापुर तसेच विखरणी ग्राहकांना ऑर्डरचे सोने, चांदीचे दागिने पोहोच करण्यासाठी त्यांच्या दुचाकीवर आले.

त्यांनी विखरणी येथील बाजार करून विसापूर रोडने मनमाड कडे जात असताना दुपारी पावणेपाचच्या सुमारास खडीक्रशरजवळ पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवुन बाविस्कर यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवत त्यांचे जवळ असलेला १ लाख ३० हजार रुपयांचा सोने चांदीचे दागिन्यांचा ऐवज लुटुन नेला. या प्रकरणी येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदिप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्वलासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, पो.हवा. माधव सानप, किरण पवार, आबा पिसाळ, सतिश मोरे, मुकेश निकम, यांनी तपास सुरू केला.

तपासा दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी २४ तासाचे आत गुन्ह्याचा मास्टर माईंड चेतन शशिकांत पवार (वय २२), रा.तिसगाव, ता. चांदवड यास येवला तालुक्यातील गुजरखेडे येथुन ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोलिसांनी त्याचे साथीदार समाधान सुकदेव मोरे, (वय २०), रा. विखरणी, ता. येवला, योगेश रमेश पवार (वय २०), रा. विखरणी, ता. येवल, सतिश शिवाजी माळी (वय २२), रा. दरसवाडी, ता. चांदवड, भुषण बाळू पवार (वय २७), रा. रायपुर, ता. चांदवड यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या पाचही चोरटयांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंग रजपुत करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com