दरवाजा तोडून चोरट्याने पळविली रक्कम

Crime news
Crime news

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील एका दुकानाचा दरवाजा तोडून चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे दीड लाखांची रोख रक्कम (amount) चोरून नेल्याची घटना उपनगर परिसरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामहरी शिवराम मुराडे (पिंटो कॉलनी, जेलरोड) यांचे उपनगरच्या मस्जिद समोर एस. आर. ट्रेडिंग (S. R. Trading) नावाचे दुकान आहे. जिवंत बॉयलर (Boiler) पक्षी खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी मुराडे यांना त्यांच्या ग्राहकाने व्यवहारातील 1 लाख 40 हजार रुपये रोख आणून दिले होते.

Crime news
...अखेर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ; लढ्याला मोठे यश

मुराडे यांनी ही रक्कम आपल्या टेबलाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवून कुलूप लावले होते. त्यानंतर मुराडे हे कामानिमित्त बाहेर गेल्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घेतले.

सोमवारी दुपारी बारा वाजता कर्मचारी वैष्णवी जाधव (Vaishnavi Jadhav) या दुकानाजवळ आल्या असता त्यांना ऑफिसचा मुख्य दरवाजा उघडा व कडी कोयंडा तुटलेला दिसून आला. ही परिस्थिती बघितल्यावर त्यांनी मुराडे यांना फोन करून सदर प्रकार सांगितला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मुराडे व कर्मचाऱ्यांनी दुकानात जाऊन बघितले असता चोरट्याने कपाट, ड्रॉव्हरमधील सामान व कागदपत्रं विस्कळीत केलेली दिसून आले. तसेच, ड्रॉव्हरमधील 1 लाख 40 हजार रुपयाची रोकड चोरून नेल्याचे आढळून आले. यासंदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात (police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

Crime news
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com