नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

पवन नगर पाण्याच्या टाकी समोर अज्ञात दुचाकीस्वाराने एका महिलेच्या गळ्यातील पोत चोरून पोबारा केल्याची घटना घडली.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरिता राजेंद्र बडगुजर ( =52, रा. प्लॉट नंबर 13 सर्वे नंबर 14 हरी ओम कॉलनी पवन नगर पाणी टाकी समोर) ह्या रात्रीच्या सुमारास फेरफटका मारायला निघाले असता समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची 20 हजार रुपये किमतीची मणी पोत व चाळीस हजार रुपये किमतीचे एक दुसरी पोत तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यातील एक पोत तोडण्यास सदर भामट्याला यश आले व त्याने घटनास्थळावरून पोबारा केला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत.