लाखो रुपयांसह चोरटा ताब्यात

लाखो रुपयांसह चोरटा ताब्यात

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

मुंबईहून रेल्वेने पळून जाणार्‍या चोरट्यास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की पायधूनी पोलीस स्टेशन मुंबई येथील कलम 408 गुन्ह्यातील आरोपी संदीप अशोक कुमार शुक्ला (32), रा. गोंडा, उत्तर प्रदेश हा 28 लाख रुपये रोख घेऊन पळाला असुन तो ट्रेनने जात असल्याची माहिती पायधूनी पोलिसांकडून नाशिकरोडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाली.

शिंदे यांनी त्वरित गुन्हे शोध पथकातील सपोनि योगेश पाटील यांना सूचना दिल्या. अंमलदार शिंदे, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे यांनी त्वरित पनवेल गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये इगतपुरीचे पोलीस अंमलदार योगेश पाटील यांच्याशी संपर्क करुन आरोपीची माहिती दिली आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकात गाडी पोहोचताच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलिसांना बघून नागरिक घाबरून हैराण झाले ते लोकांनां समजेना. पोलिसांना बघून आरोपी पळत सुटला, तेवढ्यात पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. आरोपी शुक्ला याच्याकडे चोरी केलेले संपूर्ण 28 लाख रुपये पोलिसांना मिळाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com