राष्ट्रध्वजासाठी झिजणारे सेवक

राष्ट्रध्वजासाठी झिजणारे सेवक

नाशिकरोड / बोलठाण | Nashikroad / Bolthan

देशसेवेची भावना ही व्यक्तीला नेहमीच प्रेरित करीत असते, असे देशसेवेत व्रतस्थ दोन लॉण्ड्रीचालक उपनगर येथील धीरज कनोजिया (Dhiraj Kanojia) व बोलठाणचे दिगंबर हरबोले (Digambar Harbole) वर्षानुवर्षे विनामूल्य तिरंग्याला इस्त्री करून त्यांच्याप्रतिने देशसेवाच करत आहेत....

देशसेवेने भारावून मागील पंधरा वर्षांपासून परिसरातील विविध शासकीय कार्यालयांचे ध्वज 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला धुवून, इस्त्री करून ते विनामूल्य कार्यालयात पोहोचवून देण्याचे काम नियमित करत आहेत.

उपनगरयेथील (Upanagar) मातोश्रीनगरमध्ये (Matoshrinagar) कनोजिया यांचे लॉण्ड्रीचे दुकान आहे. त्यांचे वडील रामप्रसाद कनोजिया हे भारतीय लष्करी विभागात वॉशर मॅन म्हणून कार्यरत होते.

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर पिढीजात व्यवसाय म्हणून त्यांनी मातोश्रीनगर येथे दुकान थाटून मुलांना त्यांच्या पायावर उभे केले. त्यांचा मुलगा धीरज यांनी व्यवसाय सांभाळून कुटुंबाला हातभार तर लावला पण रक्तात असलेली

देशसेवा त्यांनी आपल्या व्यवसायातूनच घडवून आणली. उपनगर, गांधीनगर, नाशिकरोड भागात शासकीय कार्यालये, शाळा, संस्था, यांचे ध्वज धुवून, इस्त्री करून ते पोहोचवण्याचे काम करतात. ही देशसेवा करताना ते कुठलेही मानधन घेत नाहीत.

नांदगाव तालुक्यातील (Nandgoan Taluka) घाटमाथ्यावरील बोलठाण (Bolthan) येथील दिगंबर हरबोले (वय 50) यांचे बोलठाण येथे बसस्थानक परिसरात लॉण्ड्री (इस्त्री) चा व्यवसाय आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बोलठाणसह घाटमाथ्यावरील ग्रामपंचायत, जि.प. शाळा., शासकीय कार्यालय, संस्था, बॅँक, सोसायटी आदी कुठल्याही कार्यालयातले ध्वजारोहण असो, येथील प्रत्येक ध्वज हा सुरुवातीला दिगंबर यांच्याचकडे आणला जातो.

लॉण्ड्रीचा व्यवसाय असल्याने दिगंबर गेल्या अनेक वर्षांपासून आयोजकांकडून एक रुपया देखील न घेता ध्वजाची मोफत इस्त्री करून देतात.

याशिवाय ध्वजाच्या शुभ्रतेसाठी विशेष श्रम घेतात. कुठल्याही संस्था, शाळा, ग्रामपंचायत, बॅँक कडून येणार्‍या ध्वजाला दिंगबर आदी नतमस्तक होतात. ध्वजाला इस्त्री करताना अभिमान वाटतो, असे ते गर्वाने सांगतात.

ते म्हणतात माझ्या या हातांनी होणारी हीच सेवा माझ्यासाठी देशसेवा ठरते. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही देशसेवा सुरूच ठेवणार, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com