
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक मनपा (Nashik Municipality) घनकचरा व्यवस्थापन विभागातील (Solid Waste Management Department) सफाई कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्याने
त्यांना शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीचा दि 25 ऑक्टोंबर 2012 च्या आदेशानुसार मुळ वेतनानुसार (basic pay) जादा कामाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी मूकनायक कामगार संघटनेच्यावतीने (workers union) मनपा आयुक्तांना (Municipal commissioner) साकडे घालण्यात आले.
नाशिक मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचारी (Cleaning staff) या पदावर कामकाज करणारी यांना त्यांच्या कामकाजाबाबत सार्वजनिक सुट्टी (public holiday) तसेच 2 रा 4 था शनिवारी कार्यरत कर्मचार्यांना रु.30 तासाप्रमाणे जादा कामाचा मेहताना देण्याचे यापूर्वीच आदेशीत केले आहे. सफाई कर्मचार्यांना मुळ वेतनानुसार जादा कामाचा मोबदला मिळत होता.
नाशिक मनपाने आऊटसोर्सिंगद्वारे (Outsourcing) सफाई कर्मचारी ठेका दिल्यामुळे बहुतेक सफाई कर्मचार्यांची त्यांच्या राहत्या घरापासून 15 ते 20 कि.मी. लांब इतर विभागात बदली करण्यात आली असून, त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा खर्च पडत आहे. त्यामुळे 30 रु तासाने काम करणे कठीण होणार आहे.
मनपातील इतर अधिकारी, कर्मचारी दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन, दसरा, गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, बाल्मिकी जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, मोहरम, ईद या सारखे सण (festival) आपल्या परिवारांसोबत आनंदाने साजरा करतात परंतु सफाई कर्मचारी मात्र घाणीच्या साम्राज्यात काम करत असतो त्याबाबत मनपाने प्रोत्साहन देणे अपेक्षित असतांना व सफाई कर्मचारी हे पद अत्यावश्यक सेवेत असून, त्यांच्या हक्काचा मोबदल्या पासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
सफाई कर्मचारी यांना त्यांचा जादा कामाचा किंवा सार्वजनिक सुट्टीचा मेहताना मुळ वेतना नुसार देण्यात यावे.अशी मागणी मूकनायक कामगार संघटनेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष मिलिंद बापूराव काळे, दिपक काळे सुमित जाधव, विशाल आहिरे, राजेंद्र नेटावटे, विशाल दोंदे, शैलेश बागुल, दशरथ कडाळे, राहूल पगारे, सचिन जाधव, बाबा तिनगोट आदींसह कामगार संगटनेच्या पदाधिकार्यांनी केली आहे.