
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
गौण खनिज उत्खनन (Minor Mineral Mining) आणि त्याबाबतचे कामकाज अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी (Additional Collector Babasaheb Pardhi) यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी काढले आहेत. प्रशासकीय कारण सांगत सप्टेंब महिन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Additional Collector Dattaprasad Nade) यांच्याकडून हे कामकाज काढून घेत आपल्याकडे घेतले होते.
तत्कालीन अपर जिल्हाधिकारी नडे यांनी सप्टेंबरमध्ये नाशिक (nashik) तालुक्यातील २१ खडीक्रशर सील करण्याचे आदेश काढले होते. हे आदेश काढल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नडे यांच्याकडील गौण खनिजचे सर्व कामकाज काढून घेत ते काम काढून घेताना प्रशासकीय कारण पुढे करण्यात आले होते.
गौण खनिजचे कामकाज (Minor mineral work) हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. २०२१ च्या अखेरीस तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडील अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे गौण खनिज अधिकारी यांच्याकडून ते प्रकरण अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचे.
नंतरच्या काळात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भीमराज दराडे यांच्याकडे काही काळ अधिकार देण्यात आले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी तब्बल ११४ दिवसांनंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी नूतन अपर जिल्हाधिकारी पारधी यांच्याकडे पुन्हा गौण खनिजचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.