जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत 'यांना' मिळाले विजेतेपद

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत 'यांना' मिळाले विजेतेपद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या (Nashik District Carrom Association) वतीने आणि क्रीडा संस्कृती फाउंडेशनच्या (krida sanskruti foundation) सहकार्याने लोकनेता गोपनाथराव मुंडे (Gopnathrao Munde) स्मृती चषक नाशिक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा (Nashik District Level Carrom Competition) नुकत्याच झाल्या.

या स्पर्धेत 14 वर्षे मुले- मुली, 17 वर्षे मुले- मुली आणि 19 वर्षे मुले- मुली या तीन गटांचा समावेश होता. तसेच दुहेरी (डबल्स) प्रकाराचाही समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत नाशिक जिल्हाभरातून (nashik district) 137 स्पर्धकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत मुलामध्ये राष्ट्रीय खेळाडू अय्यान पिरजादेने आपल्या दर्जाला साजेशा खेळ करून तर दुहेरीमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. अय्यानने 17 वर्ष आणि 19 वर्षे गटात विजेतेपद (championship) मिळविले तर दुहेरीमध्ये उपविजेतेपद मिळविले.

या स्पर्धेत 14 वर्षे मुलांच्या गटात उत्कर्ष परदेशीने अंतिम लढतीत ईशान शिरपूरकरला पराभूत करून विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये 14 वर्ष गटात झालेल्या अंतिम सामन्यात प्राची मनवरने सुरवातीपासून चांगला खेळ करून ऋतुजा पिंगळेला पराभूत करून विजेतेपद मिळविले. तर दिव्या सुर्वे आणि सृष्टी अमृतकर यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळविला.

17 वर्षे गटाच्या मुलीच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू कल्याणी बोंडेने आपल्या दर्जाला साजेशा सुंदर खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपद मिळविले, तर भूमिका देसलेने दुसरा क्रमांक मिळविला.19 वर्षे मुलींमध्ये चांगली चुरस दिसून आली. अंतिम लढतीत अत्यंत चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात सिद्धी पवार हिने राष्ट्रीय खेळाडू कल्याणी बोंडेच्या दबावाला बळी न पडता शेवटच्या काही मिनिटामध्ये तीन गुणांची आघाडी मिळवत ही अंतिम लढत जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले तर कल्याणीला दुसर्याि क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या दुहेरी स्पर्धातही चांगली चुरस दिसून आली. गत स्पर्धेत अंतिम फेरीत एकमेकांसमोर खेळलेल्या जोडीचीच या स्पर्धेत अंतिम लढत पार पडली. या वेळी मात्र गत स्पर्धेतील उपविजेत्या भूषण भटाटे आणि नकुल चावरे या जोडीने एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखून या चुरशीच्या लढतीत चार गुणांच्या फरकाने हा सामना जिंकून विजेतेपद पटकावले. तर अय्यान पिरजादे आणि रौफ पिरजादे यांना दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक तांदळे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त फेंन्सीगंचे खेळाडू अक्षय देशमुख, क्रीडा संघटक आनंद खरे, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू अमोल कांबळे, क्रीडा प्रशिक्षक संतोष पवार यांच्या हस्ते पार पडला. सूत्रसंचालन अभिषेक मोहिते आणि अमोल चांदवडकर यांनी केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमेश सेनभक्त, अभिषेक मोहिते, भुषण भटाटे, नकुल चावरे, नीरज कुर्हावडे, अमोल चांदवडकर, प्रथमेश ठाकरे, गायात्री वाघ, नेहा मनवर, नेहा वाळुंज, गायत्री चव्हाण आदींनी परीश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com