नासाकात आडवे येणार्‍यांना आडवे करू

नासाकात आडवे येणार्‍यांना आडवे करू
USER

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Cooperative Sugar Factory) हा या पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचा पंचप्राण व अर्थवाहिनी असल्याने तो सुरू होणे ही काळाची गरज आहे. मात्र या प्रक्रियेच्या आड येणार्‍याना आडवे केल्याशिवाय शेतकरी (Farmers) राहणार नाही, असा इशारा ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकर्‍यांनी दिला आहे.

नाशिक (Nashik), सिन्नर (Sinnar), इगतपुरी (Igatpuri) व त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar) या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला व या भागातील शेतकर्‍यांची अर्थवाहिनी समजला जाणारा नाशिक सहकारी साखर कारखाना राजकीय चढाओढीमुळे बंद पडला आहे. गेल्या आठ वर्षापासून तो सुरू करण्यासाठी प्रयत्न होत असताना अद्यापही कोंडी फुटत नाही. सन 2013 मध्ये जिल्हा बँकेचे कारखान्यावर 84 कोटीचे कर्ज झाले व कारखाना 100 टक्के एनपीत गेल्याने बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत त्याचा ताबा घेतला.

सन 2013 ते 2017 या चार वर्षांत बँकेने 54 कोटीचे व्याज कारखान्यावर लावले. 2019 पासून आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) व खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी कारखाना सुरू करण्यासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार (Former Agriculture Minister Sharad Pawar) यांचेपासून विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांच्याकडे वारंवार बैठका घेऊन कारखान्याची कोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सध्या कारखान्यावर अवसायकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबतची प्रक्रिया सुरू असताना पुन्हा राजकीय घडामोडीमुळे कारखान्याचा बॉयलर पेटतापेटता राहून जात आहे. शेतकर्‍यांनी आणलेल्या दबावापोटी खा. हेमंत गोडसे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांच्यासह नवीन कंपनीची स्थापना करून अडीच कोटी रुपये डिपॉझिट भरले. आणखी पाच कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली.

शिवाय दुरुस्तीसाठी नेमलेल्या तांत्रिक कंपनीने कारखाना 56 दिवसात गळीतासाठी सज्ज करून दिवाळीला मोळी टाकण्यास काहीच अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले. असे असतानाही केवळ निविदेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत कारखान्याचा वाया जाणारा वेळ याकडे दुर्लक्ष केले. ही प्रक्रिया लाबल्याने शेतकर्‍यांना धक्का बसला आहे.

कारखाना कोण सुरू करणार व केव्हा सुरू होणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे. कारखाना सुरू झाला तर गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायटी व कारखाना कार्यस्थळावरील छोटेमोठे लघुउद्योग सुरु होऊन याचा लाभ जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीला झाला असता. आज बँकेला एक रुपया वसूल न होता उलट संरक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

कारखाना सुरू करण्यास बँकेसह लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती दिसून येत नाही, ही बाब आता समोर येत आहे. याला राजकीय वास येत असून शेतकरी कदापीही तो सहन करणार नाही. याबाबत लोकप्रतिनिधीने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणीच कारखाना चालू करण्यासाठी पुढे येत नसताना खा. गोडसे जर त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पुढाकार घेत असतील तर त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

नासाका कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक तर भाजपचे तीन आमदार असून शिवसेनेचा (Shiv Sena) खासदार आहे. असे सर्व लोकप्रतिनिधी असताना कारखाना सुरू करण्यास कोण अडथळे आणीत आहे. या सर्वांनी जर ठरवले तर कारखाना सुरू होण्यास अडचण येणार नाही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन बाबुराव मोजाड,

रघुनाथ बरकले, श्रीकिसन बरकले, उत्तमराव वाजे, सुखदेव वाजे, भाऊसाहेब दळवी, सुखदेव हगवणे, यशवंतराव आरोटे, बाळासाहेब जाधव, पांडुरंग दळवी, रामकृष्ण ठुबे, तानाजी करंजकर, कैलास वाजे, विश्राम शेळके, दत्तू शेळके, लक्ष्मण भोर, परसराम दळवी, सयाजी भोर, प्रकाश करंजकर, बाळासाहेब देशमुख, रामदास थोरात, शंकर मुठाळ, प्रभाकर गायकवाड, विष्णू गायकवाड, संपतराव काळे, पी.एल. गायकवाड आदींनी केले आहे.

Related Stories

No stories found.