ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी होणार

ग्रामस्थांचे आमरण उपोषण स्थगित
ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी होणार

सटाणा । प्रतिनिधी | Satana

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) भाक्षी ग्रामपंचायतीत (gram panchayat) सरपंच व ग्रामसेवक यांनी विविध विकास कामांच्या निधीत (development works fund) केलेल्या कथित लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची (Corruption) 15 नोव्हेंबर 2022 च्या आत चौकशी केली जाईल, असे लेखी आश्वासन तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी हिरे (Group Development Officer Hirey) यांनी दिले आहे.

त्यामुळे याप्रकरणी तालुका पंचायत समितीच्या (Taluka Panchayat Samiti) कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले उपोषण (hunger strike) मागे घेण्यात आले. दरम्यान, पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानुसार भाक्षी ग्रामपंचायत मधील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी (Corruption investigation) न झाल्यास पुनश्च आमरण उपोषण केले जाईल असा इशारा उपोषणकर्ते प्रकाश देवरे यांनी दिला आहे.

भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच पूनम सूर्यवंशी व ग्रामसेवक निसार शेख यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या निधीत (development works fund) लाखो रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) तक्रार प्रकाश देवरे, पंकज कापडणीस व गोरख देवरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने बागलाण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी याबाबत चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते.

मात्र, दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी स्थानिक गटविकास व ग्रामसेवक यांचे संयुक्त खाते असल्याने या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी केली जाणार नाही असा आक्षेप तक्रार कर्त्यांनी घेऊन तालुक्याच्या बाहेरील अधिकार्‍यामार्फत चौकशी करावी अशी पुनश्च मागणी केली होती. तसेच, याबाबत तत्काळ कार्यवाही न झाल्यास 17 ऑक्टोबर 2022 रोजी तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण (hunger strike) करण्याचा इशाराही दिलेला होता. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निफाड (niphad) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने दि 17 पासून करण्यात येणारे उपोषण करू नये असे पत्र बागलाण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी तक्रार कर्त्यांना दिले होते.

1 नोव्हेंबर 2022 पासून पुनश्च पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा तक्रार कर्त्यांनी होता. मात्र, सूचित केल्यानुसार या प्रकरणाची चौकशी न झाल्यामुळे एक नोव्हेंबर रोजी सकाळपासून उपरोक्त तक्रार कर्त्यांनी आपल्या बहुसंख्य समर्थकांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी समको बँकेचे माजी चेअरमन रमेश देवरे , पंचायत समितीचे माजी सदस्य वीरेश घोडे, एनडीएसटी सोसायटीचे माजी चेअरमन कैलास देवरे ,ज्येष्ठ पत्रकार देवरे, श्रीकांत रौंदळ प्रतिष्ठित व्यापारी सुनील निकम, भाक्षी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्र निकम, मुलाने ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दगा पाटील, रमेश देसले, तुकाराम सोनवणे, सुभाष वाघ नरेंद्र निकम, दादाजी पगारे, उत्तम रौंदळ आदींनी भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी हिरे, ग्रामविकास अधिकारी इंगळे, ग्रामसेवक खैरनार आदींनी भेट घेऊन निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांमार्फत 15 नोव्हेंबर 2022 च्या आत या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com