नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीच्या ठरलेल्या व रेल्वे प्रशासनाला चांगले उत्पन्न देणार्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे नांदगावसह परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने एक्सप्रेस रेल्वेचे थांबे पुर्ववत सुरू ठेवावे, अन्यथा प्रवाशांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. सुहास कांदे यांनी दिला आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावरील काशी, महानगरी, कामायनी, जनता, झेलम पाठोपाठ जनता एक्स्प्रेसचा थांबा रद्द होत आहे. प्रवासी, चाकरमानी सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. रद्द करण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्यांंचा थांबा पुर्ववत करण्यात यावे, अशी मागणी आ. सुहांंस कांदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

1 डिसेंबरपासून काशी, जनता कामायनी, महानगरी, झेलम एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने रद्द केले आहेत. जनता एक्स्प्रेस 1 जानेवारीपासून या रेल्वेगाड्यांंचा थांबा रद्द करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावरील महाराष्ट्र एक्सप्रेस वगळता रेल्वे गाड्याचे थांबे रद्द करण्यात आल्याने नांदगावकरांसह तालुक्यातील प्रवाशांची तसेच नोकरदारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.

या एक्सप्रेस रेल्वे थांबत असल्यामुळे प्रशासनाला मोठे उत्पन्न या स्थानकातून मिळत होते. याचा विचार देखील करण्यात आलेला नाही. रद्द करण्यात आलेल्या वरील सर्व रेल्वेगाड्या पुर्ववत करण्यात यावे, अन्यथा रेल्वे प्रशासना विरोधात तीव्र आंंदोलन छेडण्याचा इशारा आ. कांदे यांनी दिला आहे.